• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या पारधी समाजातील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 3 ऑक्टोबर 2021 रोजी रविवारी रात्री सातच्या सुमारास मृत्यू झाला होता. भीमा काळे (रा. कुर्डूवाडी,जि सोलापूर) असे मयत आरोपीचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सात मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर सोलापुरात पारधी समाजातील नागरिकांनी मोठे जन आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेनंतर भीमा काळे याच्या मृत्यु प्रकरणी सीआयडीकडे तपास देण्यात आला होता. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी 21 एप्रिल 2022 रोजी तपास पूर्ण करून विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह श्यामराव पाटील, एपीआय शितलकुमार कोल्हाळ, पोलीस कॉन्स्टेबल श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे, पोलीस नाईक अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई अतिष काकासाहेब पाटील,पोलीस नाईक लक्ष्मण पोमु राठोड यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भीमा काळे या विरोधात भादवि ३९५, भादवि ४५४,४५७,३८० असे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल होते. भिमा रज्जा काळे, (वय ४२ वर्षे, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हा वेगवेगळ्या गुन्ह्यात सोलापूरच्या कारागृहात कैद होता. न्यायालयाची परवानगी घेऊन २२ सप्टेंबर २०२१ येथून एपीआय कोल्हाळ यांनी जिल्हा कारागृह सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. न्यायालयाने २२सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती.

पोलीस कोठडीत असताना भीमा काळे यास सर्दी, ताप, खोकला व उलटया होत होत्या. अशी नोंद सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. व दोन्ही पायास संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजले होते. सिव्हील हॉस्पीटल येथे २४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी 2.25 वा मेडीकल यादीसह तत्कालीन एपीआय कोल्हाळ यांनी उपचारास दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना संशयीत आरोपी भिमा रज्जा काळे हा 3 ऑक्टोबर 2021 रोजी पावणे नऊ च्या दरम्यान मयत झाला.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार पोलीस कोठडीत अटक असलेला संशयीत आरोपी भिमा रज्जा काळे याने गुन्हा कबुल करावा व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल काढुन द्यावा म्हणून त्यास गुन्ह्याचे तत्कालीन तपासी अधिकारी एपीआय कोल्हाळ, पोहवा श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डम, पोशि अतिश काकासाहेब पाटील, व पोना लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कोठडीतील संशयीत आरोपी भीमा काळे यास मारहाण केली होती.

भा.द.वि.395 मधील संशयीत आरोपी भिमा काळे यास मारहाण केली होती. तसेच झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मयत भीमा काळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहित असतानाही त्याला वैद्यकीय गरज होती. आजारपण व झालेल्या मारहाणीमुळे जखमांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. संशयीत आरोपीस तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्युस कारणीभुत झाल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भा.द.वि. 304, 330, 166, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सीआयडीचे डीवायएसपी जी. व्ही. दिघावकर करत आहेत

Previous Post

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणारी रेणू शर्मा अटकेत

Next Post

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026