• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२३ आणि २४ रोजी प्रिसिजन संगीत महोत्सव

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2022
in मुख्य बातमी
0
२३ आणि २४ रोजी प्रिसिजन संगीत महोत्सव
0
SHARES
0
VIEWS

·         पं. दिलीप काळे यांचे संतूर वादन
·         पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन
·         “मोहिनी” – सहा महिला कलाकारांचा एक अभिनव कार्यक्रम
·         पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचा शास्त्रीय – उपशास्त्रीय गायनचा स्वराविष्कार

सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या २३ आणि २४  एप्रिल २०२२ रोजी ’प्रिसिजन संगीत महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष असून हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा उपस्थित होते.

संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंध मुक्तीनंतर प्रिसिजनचा हा पहिलाच ऑफलाईन कार्यक्रम होत आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दि.२३ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात प्रख्यात संतूर वादक पं. दिलीप काळे यांचे संतूर वादन होईल. त्यांना तबल्यावर रामदास पळसुळे हे साथ करतील. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होईल. त्यांच्या साथीला भारत कामत ( तबला ), सुयोग्य कुंडलकर ( हार्मोनियम), प्रसाद जोशी ( पखवाज ) आणि नागेश भोसेकर ( तालवाद्य ) यांची साथ असेल. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्यांचा स्वराविष्कार ऐकायला मिळणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि.२४ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात एक अभिनव कार्यक्रम ऐकायला आणि पाहायला मिळेल. “मोहिनी” असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यात सहा महिला कलाकार असून सितार, गायन, कथ्थक यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. यात सहाना बॅनर्जी (सितार), रुचिरा केदार (गायन),  सावनी तळवलकर (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), शीतल कोळवलकर (कथ्थक), अनुजा बरुडे (पखवाज) यांचा सहभाग असणार आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच आपल्याकडे होत आहे.  

रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सत्रात किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचे शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन होईल. पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचा स्वराविष्कार अनुभवणं ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी असेल.त्यांना तबल्यावर अविनाश पाटील, हार्मोनियमवर रवींद्र कातोटी, मनोज भांडवलकर ( पखवाज ) आणि विश्वास कळमकर ( तालवाद्य ) हे साथ करतील.

पुण्यातील ’सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ६ वर्ष पासून प्रयत्नशील आहे. सोलापूरातील रसिकश्रोत्यांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षीही सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येईल. त्यासाठी  निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस)  सोमवार दि. १८ एप्रिल पासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर बसण्याची सोय आहे.

प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल .रसिकश्रोत्यांनी जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.

Previous Post

स्वतः पेक्षा,समाज हितापेक्षा राष्ट्रहिताला डाँ.बाबासाहेब आंबेडकरनी प्राधान्य दिले

Next Post

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ ओटीटीवर होणार रिलीज

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ ओटीटीवर होणार रिलीज

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवर होणार रिलीज

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026