• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, April 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरचे रखडलेले प्रश्न आणि उदासीन लोकप्रतिनिधी….

by Yes News Marathi
March 23, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूरचे रखडलेले प्रश्न आणि उदासीन लोकप्रतिनिधी….
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या तयारीत आहे तसेच मार्च एन्ड आल्यामुळे प्रत्येक खात्यात आता फायली पळू लागल्या आहेत. मात्र संपणार्या या आर्थिक वर्षात सोलापूरकरांना  लोकप्रतिनिधींनी काय मिळवून दिलं याचा ताळमेळ घालण्याची आता वेळ आली आहे. सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पडत नसल्यामुळे विमानसेवा खोळंबली आहे. बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 33 हेक्टर वनखात्याची जमीन आडवी आल्यामुळे त्याचा विकास रखडला आहे. सोलापूर महापालिकेकडे भूसंपादनासाठी पैसे नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कडून केले जाणारे दोन उड्डाणपूल अधांतरी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासनावर आश्वासने दिली तरीही राज्याच्या बजेटमध्ये उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी साठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली नसल्यामुळे समांतर जलवाहिनी अद्याप गुलदस्त्यात आहे. नगरसेवकांचा कालावधी संपला आणि आता महापालिकेत प्रशासकराज असल्यामुळे शहरातील रस्ते उखडले आहेत मात्र यावर आवाज उठविण्यासाठी कोणी नाही. रडतखडत स्मार्ट सिटी योजनेतील कामे संथ गतीने सुरू आहेत मात्र सगळ्यांचे हात यामध्ये ओले झाल्यामुळे याबाबत कुणीच ब्र शब्द बोलायला तयार नाही.  गेल्या वीस वर्षापासून सोलापुरात पाण्याची बोंबाबोंब आहे. एमआयडीसीमधील आणि करताना सुटले नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांनी आता आमदार-खासदार तसेच पालकमंत्र्यांना याबाबत जाब विचारायला हवा नाही तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा हिशोब चुकता करायला हवा.

Previous Post

TATA IPL 2022 : आयपीएल तिकीट विक्री सुरु

Next Post

भारतीय लष्कराचा ४ हजार कोटींचा उपग्रह प्रस्ताव मंजूर

Next Post
भारतीय लष्कराचा ४ हजार कोटींचा उपग्रह प्रस्ताव मंजूर

भारतीय लष्कराचा ४ हजार कोटींचा उपग्रह प्रस्ताव मंजूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In