येस न्युज नेटवर्क : इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाला शनिवार दि. २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी, आयोजकांनी प्रेक्षक आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आयोजकांनी बुधवारी सांगितले की , स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच यावेळी चाहत्यांना स्टेडियमवर उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करता येणार आहे. आजपासून तिकिटांची विक्री सुरू झाली असून, चाहत्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. चाहत्यांसाठी अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर २३ मार्च रोजी दुपारी १२ पासून स्पर्धेच्या लीग टप्प्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. याशिवाय www.BookMyShow.com वरही तिकिटे उपलब्ध असतील.

