• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजप युवा मोर्चा उत्तर सोलापूर तालुक्याच्यावतीने नान्नज येथे महावितरणच्या विरोधात रास्ता रोको

by Yes News Marathi
March 14, 2022
in मुख्य बातमी
0
भाजप युवा मोर्चा उत्तर सोलापूर तालुक्याच्यावतीने नान्नज येथे महावितरणच्या विरोधात रास्ता रोको
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संभाजी दडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांची डीपी उतरवण्याचे काम महावितरण करत आहे आणि अनेक शेतकऱ्यांची लाईट तोडण्यात आलेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी रेगुलर वीजबिल भरले आहे त्यांच्यासाठी फक्त दोन तास लाईट देण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. या विरोधात त्यांचे म्हणणे मांडत असताना महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू व लाईट बिल माफ करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हटले होते.

परंतु आज त्यांनी शब्द फिरवला असून ब्रह्मदेव जरी खाली आला. तरी शेतकऱ्यांच्या लाईट बिल माफ करू शकत नाही अशा त्यांच्या स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांविषयी जे जुलमी धोरण अवलंबिले आहे त्याविरोधात हा रस्ता रोको होता. मागील अधिवेशनाच्या काळात लाईट जोडण्याचे आदेश दिले. परंतु अधिवेशन संपल्यानंतर तीनच दिवसात परत शेतकऱ्यांची लाईट तोडण्याचे काम या सरकारने केले आहे. गेल्या तीन महिन्यातून ही दुसरी वेळ असून शेतकऱ्यांना वारंवार तगादा लावला जातो. सुगीचे दिवस असून शेतकऱ्यांची सर्व पीके,द्राक्षे बागा हे विकायला आलेले आहेत. शेतकऱ्याचे म्हणणे आहे शेतातील शेतमाल विकल्यानंतर आम्ही महावितरणचा एकही रुपया ठेवणार नाही.सर्व लाईट बिल आम्ही भरू परंतु तात्काळ लाईट सुरु करा यामागणी साठी रास्ता रोको करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, युवा मोर्चा सरचिटणीस सुहास भोसले, युवा मोर्चा मीडिया प्रमुख किशन पाटील, किरण कुऱ्हाडे, मार्डी गावचे माजी उपसरपंच युवराज पवार, अझर शेख रस्ता रोकोसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टी तालुक्‍यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल सुतार सरचिटणीस अविनाश शिरसट, कारंबा गावचे सरपंच विनायक सुतारर, संजय लंबे, योगेश लंबे, गणेश माळी, योगेश गवळी, निलेश गवळी, विजय भंडारे, जगन्नाथ भोरे, संजय मुळे, सुमित बोगे, श्रीकांत गुरव, आनंद भोरे, बंटी माळी, सुशांत कोरे,संतोष म्हमाने, युनूस पठाण, वसंत वगरे, सुधाकर भोसले, मारुती आवटे, नंदकुमार विभूते, ज्ञानेश्वर कोरे उपस्थित होते निवेदन स्वीकारण्यासाठी महावितरणचे गंभीरे व तालुका पोलिस उपनिरीक्षक बंडगर उपस्थित होते. दरम्यान १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनची परीक्षा असल्याने त्यांची वाहने,ST बस व रुग्णवाहिका यांना रास्ता रोको मधून रस्ता देण्यात आला.

Previous Post

फडणवीसांच्या नोटिशीची सोलापुरात भाजपने केली होळी

Next Post

मोहोळजवळ अपघातात शेतकरी जागीच ठार

Next Post
मोहोळजवळ अपघातात शेतकरी जागीच ठार

मोहोळजवळ अपघातात शेतकरी जागीच ठार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In