सोलापूर : शिवसेना उपशहर प्रमुख संताजी (महाराज) भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ-मड्डी वस्तीत, विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ‘रक्तदान, श्रेष्ठदान’ या भावनेतून रक्तदान केले.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढदिवस साजरा करीत असताना शिवसेनेचे पदाधिकारी सामाजिक उपक्रम राबविण्यावर आणि त्या उपक्रमांचा सर्व समाजातील जनतेला अधिकाधिक लाभ होईल या भावनेतून उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उपशहरप्रमुख संताजी भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भेट देऊन, संताजी भोळे यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी ॲड. रविराज सरवदे, रवि हाक्के, संतोष कारंडे, नितीन वालेकर, यल्लाप्पा पुजारी, सुनील भोळे, महेश ठोंबरे, उमेश गवळी, बिरुदेव लवटे, अविनाश भोळे आणि राजू चौगुले,लक्ष्मण विटकर
आदी मान्यवरांबरोबरच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.