• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, July 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात ३४ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन

by Yes News Marathi
January 4, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरात ३४ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सामाजिक वनीकरण सोलापूर व महाराष्ट्र वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्याने सोलापूर येथे दिनांक ७, ८,व ९ जानेवारी २०२२ रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित केले आहे अशी माहिती डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिली.

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे असून प्रा. डॉ. निनाद शहा यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे. या संमेलनाच्या कार्यशाळेचे उदघाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे, तसेच संमेलनाचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते एम आई टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणेचे सचिव स्वाती कराड चाटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनासा अमरावतीहून व नाशिकहून येणाऱ्या सायकल रॅलीचे स्वागत पोलीस आयुक्त हरीश बेजल करणार आहेत.

या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून सापमार गरुड (शॉर्ट टोड स्रेक ईगल) याची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा माळरान व गवताळ प्रदेश व त्यावरील जैविक विविधता यासाठी समृद्ध असून या माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. यामधील सापमार गरुड पक्षी या माळरानावरील वैभव म्हणून ओळखला जातो. या संमेलनाची संकल्पना “माळरान- शिकार पक्षी – संवर्धन” असे ठेवण्यात आली आहे. या संमेलनाच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन घेण्यात आले. या उपक्रमातून पक्षी हा आपल्या निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण, संगोपन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा संदेश आम्ही दिला. या संमेलनात दरम्यान प्रख्यात पक्षीमित्र श्री मारुती चितमपल्ली व बी एस कुलकर्णी या दोन व्यक्तींच्या सन्मानार्थ उपक्रम राबविण्यात आले.

सोलापुरातील वनक्षेत्र हे उत्तर १८% असून येथे ३५७ प्रजातीचे पक्षी आढळतात. यामुळेच सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर आहे. असे प्रसिद्ध पक्षीतज्ञ व पक्षी मित्र श्री सलीम अली यांनी म्हटले होते. या संमेलनामध्ये पक्षी निरिक्षण भ्रमंतीसाठी हिप्परगा तलावाची भ्रमंती, सिद्धेध्वर वनविहाराची भ्रमंती व माळरानावर भमंती आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी ७ जानेवारी या रोजी पक्षीमित्रांसाठी दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जखमी पक्ष्यांची निगा कशी राखावी व फोटो एडिटिंग या विषयांवर कार्यशाळा आयोजित केली आहे. दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी पक्षी या विषयांवर व्याख्य़ाने, शोध निबंध, मुलाखत आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे उद्धेश साध्य करून सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे हा संदेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र यर पक्षीमित्र राज्यसंघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, धेर्यशील पाटील, उपसंरक्षक महाराष्ट्र वन विभाग सोलापूर, सौ. पाटील विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर यांची मोलाची साथ, सहयोग व मार्गदर्शन मिळत आहेत.आम्हास महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून सहकार्य व योग्य मार्गदर्शन मिळत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातील सरकारने सूचित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे संमेलन पार पाडले जाईल.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात 75 हजार विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत

Next Post

म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली

Next Post
म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली

म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group