सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांसह सात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची बदली नियंत्रण कक्षाला करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले उदयसिंह पाटील यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची सदर बझार पोलीस ठाण्यात बदली केली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे यांची नियंत्रण कक्षात, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांची प्रभारी अधिकारी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सुरक्षा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांची सदर बझार पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील नागेश मात्रे यांची सदर बझार पोलीस ठाण्याला बदली करण्यात आली आहे.