येस न्यूज मराठीच्या वतीने फोटोग्राफी दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेत एकूण 76 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांनी 159 फोटो ऑनलाइन पद्धतीने येस न्यूज मराठीकडे पाठवले होते यातील संतोष धाकपाडे यांना प्रथम क्रमांकाचा तर चेतन लिगाडे यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. प्रमोद महिंद्रकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या स्पर्धेसाठी प्रवीण गायकवाड,अहमद शेख, प्रथमेश शिंदे यांनी देखील सुंदर फोटो पाठवल्यामुळे त्यांना उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोलापुरातील उत्कृष्ट फोटोग्राफर महेश बनसोडे, येस न्यूज मराठीचे विजय आवटे यांनी या फोटोग्राफरची निवड केली.

उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार अहमद शेख 
उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार प्रवीण गायकवाड 
उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार प्रथमेश शिंदे 
तृतीय क्रमांक प्रमोद महिंद्रकर 
द्वितीय चेतन लिगाडे

प्रथम क्रमांक संतोष धाकपाडे










