• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात अनाथांना एक टक्का आरक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2021
in मुख्य बातमी
0
राज्यात अनाथांना एक टक्का आरक्षण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेलं असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासह मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत दोन मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करण्याचे निश्चित झाले तर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवण्याचा निर्णय झाला. राज्य सरकारने २०१८ मध्ये अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण दिले होते. मात्र, त्याबाबतच्या शासन निर्णयात त्रुटी होत्या. त्यामुळे अनेक मुलं आरक्षणापासून वंचित राहिली. आता त्यात आवश्यक बदल करण्यात आला असून सरसकट सर्व अनाथ मुलांना आता या आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबाबत माहिती दिली. ‘नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह’ ही सुधारित योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यामुळे महानगरांप्रमाणेच जिल्ह्यांच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असून त्यांच्या प्रगतीच्या संधी विस्तारतील, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्यात एकूण ५० वसतिगृहे बांधली जाणार आहेत. त्यात मुंबई शहरात ४, उपनगरात ६ आणि ठाण्यात ४ वसतिगृहे बांधली जातील, असे ठाकूर यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय:

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी – १) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय.
  • अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघु पाटबंधारे प्रकल्पास १९३.८१ कोटींची सुधारित मान्यता.
  • भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करणार.
Previous Post

सोलापूर विद्यापीठ । पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठीअर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ

Next Post

राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण : राहुल गांधी

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण : राहुल गांधी

राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण : राहुल गांधी

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026