• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2021
in मुख्य बातमी
0
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : “सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या अनधिकृत को-जनरेशन चिमणीचे डेथ सर्टिफिकेट तयार- मग आयुक्त अजून कशाची वाट बघत आहेत?”
सोलापूर: १६/०७/२०२१. सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी आज काही वृत्तपत्रांना दिलेल्या आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत को-जनरेशन चिमणीचे पाडकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याच्या अहवालाची वाट ते पाहत आहेत.दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी अवर सचिव, किशोर गोखले यांनी आयुक्तांना एका पत्राद्वारे चिमणी पाडकाम करण्यासाठी आम्ही विधी व न्याय खात्याचा अहवाल घेत आहे त्याची वाट पहावी व सोलापूर येथे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर आहे एवढा मोजकाच मजकूर पाठवला होता. खरेतर सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी सर्वोच्च न्यायालयाने, विमान प्राधिकरण ,एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रदूषण नियंत्रण मंडळ व सोलापूर महानगरपालिका या सर्वांनी कोणतीही परवानगी न घेता बांधल्यामुळे बेकायदेशीर व अनधिकृत आहे व त्यामुळे होटगी रोडच्या सुसज्ज विमानतळास अडथळा होत आहे अशा ऑर्डर्स वारंवार दिलेल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अजून वेगळा काय अर्थ निघणार आहे ? आणि असा अहवाल येण्यासाठी पाच महिने कालावधी का लागतो ?
खरेतर न्यायालयाच्या आदेशानुसार हया चिमणीचे पाडकाम होत नसल्याने येथील आयुक्त, जिल्हाधिकारी व कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी व कारखाना प्रशासनावर डॉ. संदीप आडके व संजय थोबडे यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. हे पाडकाम जर त्वरित झाले नाही तर या याचिकेद्वारे या सर्वांवर अत्यंत कठोर कारवाई अटळ आहे .
दि.०८ जून २०२१ च्या राष्ट्रीय हरित लवादाच्या ऑर्डरनुसार दि.०८ ऑगस्ट २०२१ पर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याने केलेल्या सर्व प्रदूषणाचा व त्यावर येथील प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अहवाल येथील जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळास देणे भाग आहे त्यानुसार दि.०५/०७/२०२१ ला जील्हाधिकार्‍यांनी सोलापूर महानगरपालिकेस किशोर गोखलेंच्या पत्रास त्याच दिवशी उत्तर द्या असे ठणकावून सांगितले होते आणि इतर संबंधित सर्व विभागांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले होते .१५ दिवसापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर फौजदारी कोर्ट केस दाखल केली आहे. दि.१५/०७/२०२१ रोजी विमानतळ प्राधिकरण सोलापूर यांनी कलेक्टरांना ही अडथळा करणारी बेकायदा चिमणी डीजीसीए यांच्या दि.०३/१२/२०१९ च्या ऑर्डर प्रमाणे व १९९४ कायद्याप्रमाणे त्वरित काढून टाकावे असे पत्र दिले आहे .नुकत्याच सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या चिमणीच्या पाड कामासाठी लागणाऱ्या १ कोटी १७ लाख खर्चाच्या निवीदेस सुद्धा मंजुरी मिळाली आहे मग अशा परिस्थितीत आयुक्त कशाची वाट पाहत आहेत? आणि चिमणी पाडकामाचा मुहूर्त कधी निघणार आहे?
अशाच प्रकारचे पत्र दि.०२/१२/२०१९ रोजी किशोर गोखले निच तत्कालीन प्रभारी आयुक्त व कलेक्टर श्री.राजेंद्र भोसले यांना दिले होते त्यावर एका दिवसात डॉ. राजेंद्र भोसले यांनी सविस्तर अहवाल देऊन हे बेकायदा चिमणी पाडकाम रोखता येणार नाही असा अहवाल दिला होता. एक आयुक्त एका दिवसात किशोर गोखल्यांना उत्तर देतात तर दुसरे आयुक्त त्याच किशोर गोखल्यांना उत्तर देण्यास पाच महिने टाळाटाळ करत आहेत. बोरामणी विमानतळ मंजूर होऊन १५ वर्ष झाली आहेत त्याचा अजून १० टक्के सुद्धा निधी मंजूर नाही आणि ते होण्यास पुढील किमान १५ वर्ष कालावधी लागेल , त्यामध्ये कत्तल खाण्यासारखे व जमीन संपादना सारखे बरेच अडथळे आहेत. आणि विशेष म्हणजे दि.२९ जून २०१७ च्या अवर सचिव यांनी कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना लिहिलेल्या पत्रा मध्येच नमूद केले आहे की बोरामणी विमानतळ होण्यास खूप अवधी आहे आणि जरी बोरामणी विमानतळ कार्यान्वित झाले तरी होटगी रोड विमानतळावरील वाहतूक ही बंद करता येणार नाही, त्यामुळे बोरामणी विमानतळाचे कारण सांगण्याचे कोणाला प्रयोजनच उरले नाही.
३ महिन्यापूर्वी या साखर कारखान्याच्या अनधिकृतपणे बांधलेल्या काडादी मंगल कार्यालयामध्ये विरोध असताना तब्बल २.५ कोटी रुपये खर्च करून फक्त ९० रुग्णांसाठी १ महिन्यासाठी कोवीड हॉस्पिटल उभारण्यात आले होते त्यावेळी आयुक्तांनी या खर्चाची मान्यता कोणाकडून घेतली ?सोलापुरातील अत्यंत प्रदूषित असलेल्या कारखान्याच्या प्रांगणातच कुठलाही सुज्ञ माणुस हॉस्पिटल उभा करू शकत नाही आणि नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय अहवालानुसार ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त त्या ठिकाणी कोवीडचे रुग्ण आणि मृत्युदर जास्त असतात असे सांगितले आहे आणि त्याची पुष्टीच राष्ट्रीय हरित लवादाने या कारखान्याने केलेल्या प्रदूषणावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे झालेली आहे.केवळ आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा व आपल्या पदाचा दुरुपयोग करून लोकांचे २.५ कोटी रुपये मातीमोल करून प्रशासनाने फार मोठा भ्रष्टाचार आणि महापाप केलेले आहे त्यामुळे करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना येथील विमानतळ त्वरित चालू होणे गरजेचे आहे हे जाणून तरी आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेबांनी कुठल्याही सबबी न सांगता हे चिमणी पाडकाम करून होटगी रोड विमानतळ त्वरित कार्यान्वित होण्यास कायद्यानुसार मदत करावी आणि येथून पुढे अनधिकृत कृत्यांना पाठीशी घालू नये हीच अपेक्षा.

Previous Post

तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन

Next Post

सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026