• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याचा दहावी निकाल 99.27 टक्के

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पुणे विभागाचा निकाल 99.95 टक्‍के लागला आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्‍के लागला असून मुलांनी यंदा बाजी मारली आहे. परीक्षा न झाल्याने मागील गुणांचा आधार घेऊन हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अंदाजित 350 मुलांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून 270 शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. त्यात सोलापूर शहर, माढा व मंगळवेढ्यासह अन्य तालुक्‍यांतील शाळांचाही समावेश आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिली.

कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नववीचे गुण, दहावीतील अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिकावर आधारित हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा निकालाची टक्‍केवारी वाढणार हे निश्‍चितच होते. सोलापूर जिल्ह्यातील 68 हजार 22 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी 68 हजार 18 विद्यार्थ्यांनीच शाळांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे निकालाची टक्‍केवारी थोडीशी कमी झाली आणि यंदा 99.27 टक्‍के निकाल लागला. दहावीच्या निकालाची टक्‍केवारी वाढली, परंतु पुढील प्रवेशासाठी आता त्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. त्याची तारीख अजून जाहीर झाली नसून दोन दिवसांत त्याची घोषणा होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल अमान्य आहे, त्यांच्यासाठीही नवा पर्याय दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना 100 टक्‍के गुण मिळाले आहेत, त्यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरवात केली आहे. तर ज्या शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
अक्‍कलकोट : 97.48,बार्शी : 98.99,करमाळा : 99.76,माढा : 99.79,माळशिरस : 99.61,मंगळवेढा : 99.83,मोहोळ : 99.79,पंढरपूर : 99.85,सांगोला : 99.90,सोलापूर शहर : 98.85,
निकालासंदर्भातील ठळक बाबी…

  • जिल्ह्यातील 68 हजार 22 पैकी 68 हजार 18 विद्यार्थी उत्तीर्ण * 38 हजार 931 मुले तर 29 हजार 87 मुलींचा पुणे बोर्डाकडून निकाल जाहीर * सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.27 टक्‍के; माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा अव्वल * जिल्ह्यातील मुलींचा निकाल 99.16 टक्‍के तर मुलांच्या निकालाची टक्‍केवारी 99.36 टक्‍के * जिल्ह्यातील 350 पेक्षा अधिक मुलांना शंभर टक्‍के गुण * जिल्ह्यातील जवळपास 270 हून अधिक शाळांचा निकाल 100 टक्‍के

Previous Post

सोलापूर महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल

Next Post

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार – केंद्र सरकार

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार – केंद्र सरकार

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार – केंद्र सरकार

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026