धनगर समाजातील पहिल्या महिला प्रशासकीय अधिकारी
दक्षिण सोलापूर : सोलापूरच्या कन्या व माजी सैनिक शंकरराव खांडेकर यांची कन्या नैना खांडेकर यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. प्रशासकीय सेवेमध्ये सन १९९२ मध्ये पहिल्यांदा उपजिल्हाधिकारी म्हणून या सेवेत रुजू झाल्या. यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून उस्मानाबाद, कुर्डूवाडी, सोलापूर, सांगली, नाशिक, पुणे आणि आता जिल्हाधिकारी म्हणून गोंदिया येथे पदभार स्वीकारला आहे.
धनगर समाजातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून प्रशासनातील उत्कृष्ट अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या उत्कृष्टसेवेबद्दल आजपर्यंत विविध स्तरावरील अनेक पुरस्कार व पदक मिळालेले आहेत. ते एका सर्वसामान्य माजी सैनिक कुटुंबातील कन्या असल्यामुळे त्यांच्या कामाचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कांदलगाव येथील इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बिराप्पा शेजाळ व सचिवा आकांक्षा शेजाळ यांनी सत्कार केला आहे.









