• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या मार्शल लॉ इतिहास आता पडद्यावर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 7, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या मार्शल लॉ इतिहास आता पडद्यावर
0
SHARES
0
VIEWS

वेब सिरीजची निर्मिती होणार; सोलापूर सोशल फौंडेशनचा पुढाकार

 सोलापूर : सोलापूरच्या मार्शल लॉ वर आधारित असलेला इतिहास आता  पडद्यावर येणार असून सोलापूर सोशल फौंडेशनच्या पुढाकारातून यावर आधारित वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 भारताला स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे आणि तिथून स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवाला सुरूवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आता  सोलापूर सोशल फौंडेशन सोलापूरच्या मार्शल लॉ चा इतिहास पडद्यावर प्रत्यक्षरूपात साकारणार आहे. याबाबत बोलताना सोलापूकर म्हणाले की, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सोलापूरचे स्थान आणि योगदान हे आगळेवेगळे राहिलेले आहे. मात्र या योगदानाविषयी देशवासीयांना जेवढी माहिती असायला पाहिजे तेवढी ती नाही म्हणून अमृतमहोत्सवाचा योग साधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज तयार केली जाणार आहे. यात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सोलापूरचे योगदान किती आणि कसे आहे, यावर प्रकाश टाकला जाणार आहे. यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार आहे.  या योगदनाविषयीचा अधिकृत इतिहास संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक टीम पुढील तीन चार दिवस सोलापुरात  इतिहासाबाबत माहिती घेणार आहे.  मात्र यासाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज, पुस्तके, पत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे अजूनही सर्वत्र विखुरलेली आहेत. अशा प्रकारचे पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनी या मालिकेसाठी ती द्यावीत, जेणेकरून खरा इतिहास सर्व प्रेक्षकांसमोर मांडताना सोपे जाणार आहे. हे दस्ताऐवज देणार्‍या लोकांकडून त्यांच्या प्रति करून घेतल्या जातील आणि मूळ दस्ताऐवज त्यांच्याकडेच राहतील.      ज्यांच्याकडे असे दस्ताऐवज असतील किंवा ज्यांना अशा पुराव्याची, दस्ताऐवजांची माहिती असेल त्यांनी  विपुल लावंड ( 7767080999) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सोलापूकर म्हणाले.  या पत्रकार परिषदेला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,  संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक  आदींची उपस्थिती होती.

Previous Post

महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड यांना मिळाले केंद्रात मंत्रिपद

Next Post

सोलापूर महापालिका करणार दोन महिन्यात 1 लाख वृक्ष लागवड

Related Posts

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
Next Post
सोलापूर महापालिका करणार दोन महिन्यात 1 लाख वृक्ष लागवड

सोलापूर महापालिका करणार दोन महिन्यात 1 लाख वृक्ष लागवड

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026