येस न्युज मराठी नेटवर्क : ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीनं सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा दाखवला होता. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा मागे घेतला. या नकाशामध्ये जम्मू व काश्मीर आणि लडाख हे भारताचाच भाग न दाखवता स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून, एफआयआरमध्ये ट्विटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या नावाचाही समावेश आहे.