सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 सोमवार दिनांक 28 जून च्या अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नव्याने २०९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . २४६ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक रुग्ण सांगोला तालुक्यात ४३ आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे तीन रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसीसचे आज नवीन दोन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.