४०२ जण कोरोनामुक्त, ९ जणांचा मृत्यू
सोलापूर : जिल्ह्यातील covid-19 चा रविवार दिनांक २७ जून चा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये नव्याने ३५१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ४०२ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत . नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . कोरोना बाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक १०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढा तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आज म्यूकरमायकोसिसचे नवीन ५ रुग्ण आढळले असून ७ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.