सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा 5 जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित 110 महाविद्यालयांमधील तब्बल 62 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. विकास कदम यांनी दिली.
अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान, कला, वाणिज्य, बीएड, लॉ अशा विविध अभ्यासक्रमाची परीक्षा जुलै-ऑगस्ट या काळात होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 28 जूनपर्यंत आहे. त्यात बीएड आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी 23 जूनपर्यंत तर उर्वरित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना 28 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.