सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा बुधवार दिनांक २३जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यातील ३९४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ३४७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय कोरोनाबाधितांचा आढावा घेतला असता पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ८४ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस चे ३ नवे रुग्ण आढळले आहेत.म्यूकरमायकोसीसचे ३ रुग्ण आज मृत्युमुखी पडले आहेत.