सोलापूर : माझ्या विरोधात तक्रारी अर्ज का दिला ? अशी विचारणा करून बाळासाहेब रामचंद्र गवळी याला गवळी वस्ती येथील ब्रह्मदेव दादा माने बँकेचे शेजारच्या रिक्षा स्टॉप जवळ मारहाण करण्यात आल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अंकुश केदार , अनिकेत केदार, भारत केदार , किरण केदार आणि दीपक साळुंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करून हातातील लोखंडी पट्टीने डोक्यावर व गुडघ्यावर मारहाण केल्याचे गवळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे हवालदार गवळी अधिक तपास करीत आहेत.