सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट येथे पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तकांच्या धरणे आंदोलनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने हक्काच्या मागण्यांसाठी १५ जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आशा वर्कर ना आठ ते दहा तास काम करून देखील योग्य मोबदला दिला जात नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आशा व गटप्रवर्तक संयुक्त कृती समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धाराम उमराणी आणि जिल्हा सचिव पुष्पा पाटील यांनी विविध १७ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.