सोलापूर : मौलाली चौक येथील रहिवासी नागेश भीमा कोंचीकोरवी यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून ३५ हजार रुपये किमतीचे दागिने,मूर्ती तसेच मंगळसूत्र व पितळी समई चोरीस गेल्याची फिर्याद सदर बझार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये देवीचे पन्नास चांदीचे डोळे , चांदीचे दहा पाळणे , चांदीचा घोडा, चांदीचा देवीचे चित्र असलेला बिल्ला, चांदीची हनुमान मूर्ती, चांदीची नागाची मूर्ती आदी वस्तूंचा समावेश आहे. ही चोरी १४ जून ते १९ जून दरम्यान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नागेश कोंचीकोरवी हे सध्या मुंबईत विक्रोळी पूर्व येथे राहात आहेत. याप्रकरणी हवालदार नदाफ अधिक तपास करीत आहेत.










