सोलापूर : आज 21जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. या योग दिनाचे औचित्य साधून आधार योगा ग्रुप आणि संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन राजेश कोठे नगर येथील मुक्ताई मंदिरात करण्यात आलं होतं .हे शिबीर 19 जून ते 21जून या कालावधीत संपन्न झालं.
या शिबीराचा समारोप आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश वानकर व लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .

या शिबिरात सलग 3 दिवस सकाळी ५:३० ते ७ या वेळेत सहभागी नागरिकांना योग, प्राणायाम व ध्यान शिकवण्यात आले.आजच्या योग दिनानिमित्त भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्ह्या प्रभारी संतोषजी दुधाळ यांचे योगाच्या माहितीबरोबरच आहार विषयक मार्गदर्शन केले.
या तीन दिवसात आधार ग्रुप चे योग प्रशिक्षक म्हणून भगवान बनसोडे तर योग शिक्षिका म्हणून विद्या दाबडे ,अलका गवळी अनुराधा खरे यांचेही विशेष मार्गदर्शन या शिबिरास लाभले.
या शिबिरात शंकर चौगुले, लिंगाप्पा गडदे, श्रीराम मुद्दे, विलास चिंचोलकर,रंगा दिवटे, सदाशिव बंदपट्टे, रमेश धोत्रे,शिवाजी जाधव ,शरद भांगे विजय जगताप ,संजय जगताप, डॉ. बुराडे नाना कुराडे , शिरसाट अश्विनी तिरहेकर तसेच श्रीसंत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे विध्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत.
