सोलापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेल्या असताना दिराकडून भावजय चंद्रकला जाधव यांना मारहाण झाल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सेटलमेंट फ्री कॉलनीत कावळे गल्लीमध्ये हा प्रकार १६ जून रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास झाला आहे . अंबिका जाधव यांनी यलप्पा गायकवाड तसेच त्यांची पत्नी अश्विनी यल्लप्पा गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.