सोलापूर : जिल्ह्यात म्युकरमिकोसिसचे नवीन १२ रुग्ण आढळले आहेत. म्युकरमायकोसिसचे बरे झालेले रुग्ण १० असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात सध्या या आजाराने २२२ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस या आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे . त्यापैकी दहा जणांना कोरोनाची बाधा झाली होती. आज पर्यंत या आजाराचे १४४ रुग्ण बरे झाले आहेत.











