सोलापूर : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे शासकीय वितरण प्रणालीचा तांदूळ घेऊन जात असताना ट्रकचालक हनुमंत लाडाणे याच्याजवळील तीन हजार रुपये रोख आणि ५,००० रुपयांचा मोबाईल दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून चोरल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पर्ल गार्डन ते डी मार्ट दरम्यान सर्व्हिस रोडवर रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार झाला असून पोलीस सब इन्स्पेक्टर धायगुडे अधिक तपास करीत आहेत.

