सोलापूर : सोशल कॉलेजच्या बाजूला शोएब महागामी यांच्या कार्यालयासमोर एक जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमून वाढदिवस साजरा केल्याने नगरसेवक तोफिक हत्तुरेसह २५ जणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खलील महिबुब दौला कुरेशी ,शोएब महागमी, मुसेब दुरुगकर, शोएब हिरोली, अशपाक बेलीफ , इमरान तांबोळी यांचा ही समावेश आहे. याप्रकरणी जेल रोड पोलिस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर शेटे अधिक तपास करीत आहेत.
