सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये २,३०८ वाहनांची तपासणी करून एक जून रोजी २,५५,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याने ३४३ व्यक्तींना १,७१,५०० रुपयांचा दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ३४३ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत ६८,५०० रुपये दंड करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान २४ वाहने ताब्यात घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याने सात आस्थापनांना १५,००० रुपये दंड करण्यात आला.
