सोलापूर : मुरारजी पेठ येथील जुनी मिल चाळीतील आई- वडीलांचे घर खोटी कागदपत्रे तयार करून बळकावल्याने रुक्मिणी सिद्राम जमादार यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कविता कोकाटे , जुनी मिल चाळीतील चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून रुक्मिणी जमादार यांना चार बहिणी व तीन भाऊ असे वारसदार असताना कोणाचेही लेखी संमती पत्र घेतलेले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरगुडे अधिक तपास करीत आहेत.

