• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2021
in मुख्य बातमी
0
म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा
0
SHARES
0
VIEWS

31 मे ते 5 जून अभियान राबविणारपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि.28: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या आणि रक्तामध्ये शर्करा असणाऱ्या नागरिकांना म्युकरमायकोसिसचा असलेला धोका ओळखून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयात होणार तपासणी

पालकमंत्री भरणे म्हणाले, 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांची तपासणी केली जाते. याचपद्धतीने उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात 31 मे ते 5 जून या सप्ताहात अभियान राबवून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा. म्युकरमायकोसिसचा धोका ओळखण्यासाठी दंतचिकित्सकाकडून दंत तपासणी, रक्तशर्करेचे प्रमाण तपासले जाणार आहे. या तपासण्या मोफत करण्यात येणार असून नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका. शासनाकडे जादा मागणी नोंदवून रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनशिवाय दुसऱ्या प्रभावी इंजेक्शनची माहिती घ्या. औषधे असतील तर त्याचाही विचार करा. आज 500 इंजेक्शन प्राप्त झाली असून इंजेक्शनशिवाय म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यू होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

कोरोनाविषयक पुस्तिकेद्वारे पालक, मुलांचे समुपदेशन करणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तिसरी लाट गृहीत धरून सर्व यंत्रणेने काम करावे. पालक आणि बालकांना कोरोनाची माहिती व्हावी, कोरोना होऊ नये किंवा झाला तर काळजी कोणती घ्यावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पुस्तिका काढून समुपदेशन करणार आहे.

जिल्ह्यात 0 ते 3 वर्षांची सुमारे तीन बालके आणि 0 ते 18 वयोगटातील सुमारे 11 लाख 92 हजार बालके आहेत. बालकांना कोरोना होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र झालाच तर ते एकटे दवाखान्यात राहू शकत नाहीत. त्यादृष्टीने बालकांच्या पालकांचे लसीकरण घेण्याचे नियोजन करा. 7 वर्षांच्या पुढील बालकांना माहिती पुस्तिकेचा उपयोग होणार असून त्यांना त्यांच्या भाषेतील सचित्र पुस्तिका देण्यात येणार आहे. बालकांच्या रक्ताची तपासणी जिल्हाभर सुरू असून ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.

यंत्रणेने बालकांच्या बेडविषयी काम करावे. यासाठी टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ आणि बालमृत्यू आढावा समितीच्या बैठका घेऊन त्यांच्या सूचनेनुसार काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बालकांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन त्वरित पूर्ण करा. जिल्ह्यातील 10 ऑक्सिजन प्लान्टचे काम वेगाने करा, आणखी वाढीव प्लान्टचेही नियोजन करण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या.

ग्रामीण भागात बालकांच्या विलगीकरणाची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील सात ते आठ आणि शहरातील 17 बालरूग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरात सध्या 60 टक्के ऑक्सिजनचे बेड शिल्लक असून 39 व्हेंटिलेटर आणि 115 आयसीयू बेड शिल्लक आहेत, ही आशादायक बाब आहे. रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 99 वरून 128 टक्के झाला असून पॉजिटीव्हीटी दर कमी होऊन 12.19 टक्के झाला आहे. मृत्यूदरही कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या 10143 रूग्ण उपचार घेत असून नागरिकांनी सतर्कता घ्यायला हवी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यात आता नियमित लस येत असून रोज 15 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. शहरात रूग्णसंख्या कमी होत आहे. यापुढे शहराच्या तुलनेत जिल्ह्याला जास्त लस देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लसीकरण आणि कोरोना रूग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करीत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे, मारहानीचे प्रमाण वाढत आहे. ही बाब गंभीर आहे, असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले.

शंभरकर म्हणाले, गृह विलगीकरण पूर्णपणे बंद केले असून सध्या 1035 रूग्ण आहेत. ते रूग्ण गरोदर माता, लहान मुले, वृद्ध आहेत, तेही पूर्णपणे बरे झाल्याने गृह विलगीकरण यापुढे राहणार नाही. जिल्ह्यात गावनिहाय लसीकरणाचे वाटप केल्याने गर्दी आपोआप कमी झाली आहे.

स्वामी म्हणाले, जिल्हास्तरीय बालमृत्यू आढावा समिती आणि ग्रामस्तरीय दक्षता समित्यांची नियमित बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 1027 ग्रामपंचायतींनी ग्राम दक्षता समिती नेमून काम प्रभावीपणे सुरू केले आहे. रूग्णांची तपासणी, उपचार, सोय दक्षता समिती करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा आराखडा तयार केला असून अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या माध्यमातून बालकांचे समुपदेशन करण्याचे नियोजन सुरू आहे.

डॉ. ढेले यांनी तंबाखूविरोधी दिनाविषयी माहिती दिली. शिवशंकर यांनी शहरातील कोरोना स्थिती, उपाययोजना तर डॉ. पिंपळे यांनी ग्रामीण स्थिती मांडली.

Previous Post

शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांना पितृशोक

Next Post

अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय

Related Posts

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
Next Post
अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय

अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026