सोलापूर : शहरात दिवसेंदिवस कोरोना संख्या वाढत असताना “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” याअंतर्गत नागरिकांपर्यंत जनजागृतीला सुरूवात करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून सोलापूरात रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात आले. आज अक्षयतृतीय व छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनजागृतीस सुरुवात करण्यात आले.

याप्रसंगी संत महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक संजय कोळी, संजय कणके, सिद्राम बोराळे, बिपीन पाटील, संतोष म्हामाणे, उमेश काळे, महाळप्पा नवले यांच्या उपस्थितीत जनजागृतीला सुरुवात झाली. प्रभाग 3 मधिल घोंगडे वस्ती, भवानी पेठ, शाहीर वस्ती, मड्डी वस्ती या भागातील नागरीकांना जनजागृती करण्यात आले. संचारबंदी दरम्यान प्रत्येक नियमांचे पालन करा, कृपया घरातच राहा, कामाशिवाय बाहेर पडूच नका, गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जायचे टाळा, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा, आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ करा किंवा सॅनिटायझरचा वापर करा अश्या घोषणेने जनजागृती करण्यात आले.
