येस न्युज मराठी नेटवर्क : मक्का मशिदीसमोर सात मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फैसल सालार यांनी या ठिकाणी गर्दी करू नका असे सांगितले. त्यावेळी नयुम सालार ,इम्रान सालार आणि सादिक शेख यांनी फैसल सालार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दमदाटी केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर तळे करीत आहेत.