• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत मिळण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 7, 2021
in मुख्य बातमी
0
खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत मिळण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि, ७: जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके कमी पडणार नाहीत. गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने योग्य नियोजन करावे. रब्बी पिकाचा जिल्हा आता खरिपाचा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू लागली आहे. ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरून ३ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे.

शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची गुणवत्ता चांगली मिळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण कक्षाने कडक कारवाई करावी. बी-बियाणे निकृष्ठ किंवा बनावट असतील, इतर कृषी निविष्ठांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर दोषींवर कृषी, महसूल विभागाने कडक कारवाई करावी. शिवाय बी-बियाणे आणि खतासोबत इतर कीटकनाशके खरेदी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक नाही. शेतकऱ्यांना कोणी खरेदीची जबरदस्ती केल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना निलंबित करा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी करावी. पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, खतांची दरवाढ, वीज जोडणी, शेततळे, नादुरुस्त बंधारे याबाबत मांडलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावणार असल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.

माने यांनी सादरीकरणाद्वारे खरिपाच्या नियोजनाची माहिती दिली. यंदा ३ लाख ७५ हजार ८०२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये कडधान्याचे प्रमाण जास्त आहे.

वेबिनारद्वारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन

मागील चार-पाच वर्षात केळी, द्राक्षे, डाळिंब यांचे जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे वेबिनारद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ७२७ ग्रामकृषी विकास समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये १११ शेतकरी निवडले असून व्हाट्सएपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांची कार्यशाळा घेत आहेत. किसान वाणी कार्यक्रमातूनही मार्गदर्शन सुरू आहे.

कृषी योजनांच्या माहितीसाठी
८०१०५५०८७० या व्हाट्सएप नंबरवर शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची माहिती मिळणार आहे. शिवाय कृषी योजनांची माहिती मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड उपलब्ध करून दिला असून याद्वारेही पिकांचे तंत्रज्ञान, माहिती मिळणार आहे.

फेसबुक पेजद्वारेही मार्गदर्शन
यंदा ४०० शेती शाळांचे नियोजन असून यामध्ये २० महिलांसाठी असणार आहेत. आजपासून krushivibhagsolapur या फेसबुक पेजद्वारेही शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्गदर्शन करणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी सांगितले.

बैठकीला ऑनलाईनद्वारे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे हे उपस्थित होते.

Previous Post

उस्मानाबाद पालकमंत्री यांनी धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची केली पाहणी

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026