येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना काळामध्ये ग्रामीण पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या कारवाईमध्ये १९ पोलीस ठाण्यांनी ५७२ लिटर हातभट्टी जप्त कली . तर १३ पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत ७७५ लिटर देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या दारू साठ्याची किंमत ८०,६४५ रुपये आहे.याच कालावधीत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पोलिसांनी ४२०० लिटर गुळ मिश्रित रसायन आणि इतर मुद्देमाल मिळून १,७२,२०० रुपयाचा साठा नष्ट केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.