येस न्युज मराठी नेटवर्क : संजय लक्ष्मण मकनापुरे आणि उमेश मकनापुरे यांनी एकमेकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय मकणापुरे यांनी म्हटले आहे की, उमेश बलोळी याने त्याच्या दोन साथीदारांसहत घराच्या संदर्भात का भांडता अशी अशी विचारणा केली असता, उमेश बलोळी याने माझ्या वहिनी तसेच भाऊ विजय यास लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. त्याच प्रमाणे उमेश बलोली विजय मकनापुरे व इतर सात जणांविरुद्ध लाकडाने छातीवर मारहाण केल्याची तक्रार केली आहे. हा सगळा प्रकार मजरेवाडी गावठाण भागात २३ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार गायकवाड आणि लोहार या प्रकरणी तपास करीत आहेत.