येस न्युज मराठी नेटवर्क : मास्क वापरण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तुम्ही घरी किंवा कारमध्ये एकटे असाल तरी मास्क लावणे बंधनकारक आहे. नाहीतर दंड आकारला जाईल, अशी तंबीच उच्च न्यायालयाने दिली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. कारमध्ये तुम्ही एकटे असला तरी मास्क लावावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर कार सुद्धा सार्वजनिक ठिकाण असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. कारमध्ये एकटे असताना मास्क लावण्यात सांगण्यात येत असल्याबद्दल कोर्टात चार याचिका आल्या होत्या. त्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.