येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील क्रिकेटप्रेमी युवकांना सध्या होम मैदानावर प्रवेश बंदी करण्यात आल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. सोलापुरातील हे तरुण मार्केट पोलीस चौकीलगतच्या स्ट्रीट बाजाराजवळ सकाळच्या वेळेत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने महापालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने होम मैदानावरील मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना आणि क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना बंदी घातली आहे. मात्र रविवारी नॉर्थकोट हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट व्यवस्थितपणे चालू असल्याचेही दिसून आले. सोलापूर शहर व जिल्ह्यात लवकरच लोक लावून होण्याची भीती व्यक्त होत असल्याने त्याचप्रमाणे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हे तरुण क्रिकेट खेळण्यासाठीखेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले.
