सोलापूर : महापालिकेची मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा 19 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केली आहे ही सभा ऑनलाइन घ्यावी असे पत्र आयुक्त पी शिवशंकर यांनी महापौरांना दिले आहे तर विधानसभा आणि संसद प्रत्यक्ष चालू शकते तर आम्हाला ऑनलाइन सभा नको असा सूर नगरसेवकांचा असल्यामुळे rt-pcr चाचणी घेऊन सभागृहात नगरसेवकांना प्रवेश द्यावा असा प्रस्ताव भाजपचे सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी मांडला आहे त्यामुळे 19 मार्च रोजी होणारी सभा ऑनलाईन होणार की प्रत्यक्ष उपस्थित राहून होणार आणि ही सभा झालीस तर पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोणतेच धोरणात्मक निर्णय या सभागृहाला घेता येणार नाहीत त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे










