• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

by Yes News Marathi
March 3, 2021
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 3 : महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव 15मार्चपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ बनसोडे यांनी केले आहे.

महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16,2016-17,2017-18,2018-19 आणि 2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांकडून पुनश्च प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कार- 1 लाख 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्कार- 25 हजार 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्षे सामाजिक कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवा पक्षातील राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार – 10 हजार 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षे सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

अर्हताप्राप्त इच्छुक व्यक्ती/संस्थांनी अर्हतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार- चारित्र्य चांगले असल्याबाबत, कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त यांचे प्रमाणपत्र. प्रस्तावधारकाने महिलांसंबंधित केलेल्या सामाजिक कार्याची तपशीलवार माहिती. वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी कोणते पुरस्कार मिळाले आहेत त्याचा तपशील.

विभागीयस्तर पुरस्कार- संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल. संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले असल्याबाबत, त्यांच्यावर कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केले नसल्याबाबतची व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांचे प्रमाणपत्र. वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय ? असल्यास तपशील. संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.

इच्छुक व्यक्ती/संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शोभानगर, सात रस्ता, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही बनसोडे यांनी सांगितले आहे.

Previous Post

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत

Next Post

6,6,6,6,6,6 – पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

Next Post
6,6,6,6,6,6 – पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

6,6,6,6,6,6 - पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group