येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपच्या गोंधळात वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांना नोंदणीअभावी तासभर ताटकळत रहावे लागले.सोलापूर जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपच्या गोंधळात वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांना नोंदणीअभावी तासभर ताटकळत रहावे लागले. काहींना प्रमाणपत्र तर काहींना इतर तांत्रिक कारणाने परतावे लागले. एकंदरीत स्थिती बघितली तर आरोग्य कर्मचाऱ्यांहून वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह अधिक आहे.महापालिकेच्या दाराशी दवाखान्यात नावाची नोंदणी होत नसल्याने सुमारे तासभर सर्वच केंद्रात वृद्ध ताटकळत राहिले. नोंदणी सुरू झाल्यावरही गर्दीमुळे अनेकांना तब्बल तीन ते चार तासांची प्रतीक्षा करावी लागली. नावाच्या घोळामुळे काही जण लसीकरणाला मुकले. काही आजारी व्यक्तींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने त्यांनाही परतावे लागले. मेडिकलसह काही केंद्रात शेवटी ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला फारसा प्रतिसाद नव्हता. परंतु वृद्धांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. कोविड योध्यांपैकी काही जणांचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे.