• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधाची अंमलबजावणी करा – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधाची अंमलबजावणी करा –  मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, दि. १९ : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ,कोचिंग क्लासेस, खासगी प्रवासी वाहने आणि खासगी दवाखान्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वामी यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, प्रवासी वाहने, खासगी दवाखाने यांच्यावर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. मंगल कार्यालयात पन्नासहून अधिक ल़ोक आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुसऱ्यांदा पन्नासहून अधिक लोक आढळल्यास मंगल कार्यालय एक महिन्यासाठी सील केले जाईल. कोचिंग क्लासेस आणि शाळा येथे फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचा वापर केला जात असल्याची आरोग्य विभागाने तपासणी करावी. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.

आयुक्त शिवशंकर यांनी शहरातील अनेक खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या पेशंटची तपासणी करुन औषधे देतात पण त्यांची कोरोना चाचणी केली जात नाही. असे करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील मंगल कार्यालयात तपासणी केली जाणार आहे. हॉटेलमध्येही क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या सूचनांनुसार एक रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील वीस जणांची चाचणी घेतली जाणार आहे. गरज भासल्यास कंटेनमेंट झोन केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटरची पुन्हा एकदा तयारी केली जात आहे, कोणत्या प्रकारच्या औषधांचा खप वाढत आहे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्य वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, उपायुक्त धनराज पांडे, लसीकरण प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

Previous Post

छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून सांभाळले – प्रा. राजेंद्र दास

Next Post

वीट येथील महिलेच्या खुनाचा गुन्हा 48 तासात उघड…

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
वीट येथील महिलेच्या खुनाचा गुन्हा 48 तासात उघड…

वीट येथील महिलेच्या खुनाचा गुन्हा 48 तासात उघड...

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026