येस न्युज मराठी नेटवर्क : जुना पुणे नाका परिसरात धर्मवीर संभाजी महाराज पुतळा परिसरात 72 मीटर उंचीचा भव्य तिरंगा राष्ट्रध्वज लावण्यासाठी परवानगी मिळावी तसेच संपूर्ण परिसर सुशोभित करून छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिकृती तयार करावी यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी ढेंगळे पाटील यांना सोलापूर महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे यांनी निवेदन दिले आहे हे काम स्मार्ट सिटी योजनेतून त् आराखडा तातडीने तयार करावा आणि कामाची पूर्तता लवकरात लवकर करावी असे अमोल बापू शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी देवेंद्र कोठे सारिका पिसे मंदाकिनी पवार हे नगरसेवक देखील अमोल बापू शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते.