• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2021
in इतर घडामोडी
0
जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे, असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद, सचिव ओमप्रकाश तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, प्राध्यापक आर.एस. भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले.

अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणाले, योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन, चेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहे, असे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करुन विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी मानले.

Previous Post

सामना रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज

Next Post

तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीवर सदस्य नियुक्तीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीवर सदस्य नियुक्तीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन

तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीवर सदस्य नियुक्तीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026