युवा भिम सेना जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 75 बिल्डरांनी घेतला सहभाग

0
55

येस न्युज मराठी नेटवर्क : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने युवा भिम सेना 2022 जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धच आयोजन केल होत दिवसान दिवस युवक हा व्यसनहींन होत असून गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत युवक हा व्यसनमुक्त झाला पाहिजे आणि युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली पाहिजे हेच संकल्पना समोर ठेवून युवा भिम सेना श्री 2022 बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केली. यामध्ये एकूण 75 बिल्डरांनी सहभाग घेतला होता युवा भिम सेना श्री 2022 या स्पर्धेचे विजेते सोलापूरचा अभिमान ऐतिहासिक यश प्राप्त केलेले व सोलापूर जिल्ह्याचे नाव सगळीकडे नवलीख करणारेपुणे येथे झालेल्याम मि युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल स्पर्धेत 65 किलो वजनी गटात घेऊन दुसरा क्रमांक पटकवनारे हे युवा भिम सेना श्री 2022 चे मानकरी ठरले.

पंचाक्षरी लोणार यांना मानाचा पट्टा सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी पंच म्हणून प्रमोद काटे नजीर शेख गोरख गडसिंग शफी शेतसिधीं शकील बडेघर शरणकुमार कुंभार यांनी काम पाहिलं तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर साहेब विधी तज्ञ युवा भिम सेना महाराष्ट्र सल्लागार आसिफ जमादार पोलीस कॉन्स्टेबल भारत गायकवाड आसिफ शेख उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे सहकार्य मिळाले अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव अध्यक्ष विकास गायकवाड सुनील काळे सागर मार्ग प्रकाश गायकवाड आकाश शिरसागर सुनील बनसोडे हुसेन बागवान आकाश शिरसागर परिश्रम घेतले