सोलापूर – येथील 1)शरणप्पा शिवराय हांडे रा.सोलापूर, 2)अंकुश केरप्पा गरांडे 3)धनाजी विष्णू गडदे दोघे रा. मंगळवेढा, 4) सोमनिंग घोडके रा. अक्कलकोट यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनाची तोडफोड केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी त्यांना दि.12/09/2023 रोजी श्रीमती एस.एन. रतकंठवार साहेब यांचे समोर हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने चार ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यात हकीकत अशी की,
दि.11/09/2023 रोजी बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे शिक्षक भरती करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केली तसेच शाई फेक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भा. द. वि कलम 353, अन्वये सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याकामी वर नमूद चार आरोपींना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यात आरोपी तर्फे ॲड.प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे ॲड. अमर डोके यांनी काम पाहिले.