श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीत विद्यालयाचा १००% निकाल

0
29

सोलापूर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या मृदंग वादन परीक्षेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीत विद्यालय सोलापूर यांचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये ३० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यात सर्वच उत्तीर्ण झाले आहेत. १० विद्यार्थी विशेष योग्यता व इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना सोलापूर येथील नामवंत तबला वादक, संगीत विशारद संभाजी घुले यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे संस्थापक ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले, ह.भ.प. गणेश चांगभले उपस्थित होते. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.