सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण 167 अर्ज छानणी अंती शिल्लक राहिले होते त्यापैकी 144 जणांनी आज अखेर माघार घेतली. एकूण नऊ जागांसाठी 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राजा राऊत हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक आले आहेत. सोसायटी मतदारसंघात एकूण 11 पैकी नऊ जण बिनविरोध निवडून आले आहेत.यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह यशवंत शिंदे,बाळराजे पाटील, प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, सिद्धेश्वर अवताडे, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने यांचा समावेश आहे. माळशिरस सोसायटी मतदारसंघात अर्जुनसिंह मोहिते पाटील, शहाजी देशमुख आणि ज्ञानराज पाटील या तिघात लढत होणार आहे. तर सांगोला सोसायटी मतदारसंघात आमदार बाबासाहेब देशमुख विरुद्ध संजय इंगोले यांच्यात सामना रंगणार आहे. ओबीसी मतदार संघातून अजिंक्यराणा पाटील बिनविरोध निवडले आहेत. पणन मतदारसंघात संग्राम सिंह जहागीरदार विरुद्ध रणजीत शिंदे यांच्यात लढत होईल. महिला मतदारसंघात शामल बागल,अस्मिता गायकवाड, नीता देशमुख,अर्चना घाडगे,सिंधू पाटील, रुक्मिणी रणदिवे या सहा जणी मध्ये सामना होईल. अनुसूचित जाती मतदारसंघात किसन कांबळे विरुद्ध दत्तात्रय खडतरे अशी लढत होईल. एस सी मतदारसंघात श्रीधर कोंडले, अनिकेत देशमुख, धुळप्पा बंदीछोडे या तिघांचे अर्ज शिल्लक राहिले आहे. नागरी बँक पतसंस्था मतदारसंघात मनीष देशमुख, श्रीधर कोंडले, राजेंद्र गंगेदे,अमोल शिंदे हे चौघेजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुग्ध व्यक्तिगत मतदार संघात शिवाजी पाटील विरुद्ध सूर्यदीप साळुंखे यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीसाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 27 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.









