• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीच; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2020
in मुख्य बातमी
0
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीच; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बियाणे कंपन्याही पुढच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे बियाणे तयार करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेर 945 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून याची टक्केवारी 78.8 आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला असून 61 हजार 207 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 162 टक्के आहे. यात बार्शी तालुक्यातील क्षेत्र 31 हजार 749 हेक्टर आहे. काही ठिकाणी बियाण्यांच्या तक्रारी आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी घरच्या घरीच बियाणे तयार करावे लागणार आहे. बियाणांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे शेतावरच तयार करता येणार आहे. याची प्रक्रियाही सोपी आहे. बियाणांची निर्मिती, काढणी आणि साठवणूक यावेळी काळजी घेतल्यास दर्जेदार, गुणत्तापूर्ण बियाणे घरच्या घरी तयार करू शकतो, असेही श्री. माने यांनी सांगितले.

  • बियाणे तयार करण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी
  • ज्या शेतातील बियाणे तयार करणार आहोत, तेथील तण, भेसळ, रोगट, शेंगा भरत असलेली झाडे काढून टाकावीत.
  • कीड आणि रोगाचा बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी, त्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी वाढणार नाही.
  • चारही बाजूला त्याच वाणाचे सोयाबीन असावे. नसेल तर ज्या बाजूला वाणाचे बियाणे नाही, त्या बाजूला बांधापासून 3 मीटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्यावेळी घेऊ नयेत.
    कापणी वेळीच करावी. कापणीनंतर पावसात भिजलेले बियाणे राखून ठेऊ नये.
  • सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्यासाठी कापणीपूर्वी बाविस्टीन किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची फवारणी करावी.
    कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता 13-14 टक्के आणण्यासाठी 1 ते 2 दिवस बियाणे उन्हात सुकवावे. उत्पादित बियाणांची आर्द्रता 14 टक्के असेल तर मळणी यंत्राचा वेग 400 ते 500 आरपीएम आणि 13 टक्के असेल तर वेग 300 ते 400 आरपीएम असावा. अन्यथा बियाणांमध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.
  • बियाणे वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता 9 ते 12 टक्के असेल याची काळजी घ्यावी.
  • वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारण 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे.
  • साठवणूक करतेवेळी एकावर एक थप्पी ठेवण्याऐवजी बियाणे वेगळे ठेवावे. जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्यांचा वापर करून कोरड्या जागी साठवणूक करावी.
  • पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होईल. बियाणे नाजूक असल्याने उंचावरून आदळणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  • आपल्या बियाणांची उगवणक्षमता तीनवेळा म्हणजे डिसेंबर, मार्च आणि जूनमध्ये चाचणी करूनच पेरणी करावी.
Previous Post

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Next Post

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला प्रत्यक्षात झाली सुरुवात

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला प्रत्यक्षात झाली सुरुवात

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला प्रत्यक्षात झाली सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026