• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 26 – सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोनाने बाधित रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व्हेक्षणातून कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांच्या तत्काळ चाचणी करा. चाचण्यांची संख्या वाढवा,. सर्वेक्षणात माहिती न देणा-या किंवा माहिती लपवणा-या नागरिकांच्यावर गरज भासल्यास पोलीस कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी उपाययोजना करीत असतानाच त्यांना अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील, यासाठी महापालिकेने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगांने आजारी असणाऱ्यांवर उपचार करण्यात यावेत. त्यामध्ये अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्या. खासगी दवाखाने सुरू राहतील, यासाठी वैद्यकीय संघटनांची मदत घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, कोरोना विषाणूच्या विरूद्ध काम करीत असणारे विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची काळजी घ्यायला हवी. सर्वेक्षण करणारी कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड पुरवा, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरात सुरु असणारे सर्व्हेक्षण वेळेत आणि काटेकोर पणे पूर्ण केले जावे. या सर्व्हेक्षणात ताप, सर्दी आणि कोरडा खोकला असणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या निवारा शिबीरात स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात याव्यात. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जावी, असेही त्यांनी सांगितले.

केशरी कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर अंत्योदय आणि कुटुंब प्राधान्य क्रम योजनेतील लाभार्थ्यांना धान्यांचे आणि मोफत तांदळाचे वितरण करा, असे त्यांनी सांगितले. मात्र धान्य वितरण करताना दुकानांत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचवता येतील का, याबाबत प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पोलीस निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी दिलेल्या सूचना –

· कोरोना बाधित रुग्णांवर आधिक लक्ष द्या.

· ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवा.

· कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर आणि कोव्हीड हॉस्पिटल सज्ज ठेवा.

· रूग्णवाहिका सज्ज ठेवा, आवश्यकता भासवल्यास अधिग्रहीत करा.

· खासगी डॉक्टरांची सेवा घ्या. सेवेस नकार दिल्यास कारवाई करा.

· धान्याचे वितरण व्यवस्थित होईस, याकडे लक्ष द्या.

· शेती विषयक कामांकडे लक्ष द्या. बी-बियाणे, खते यांची उपलब्धता होईल याचे नियोजन करा.

· पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची मागणी आल्यास टॅंकर पुरवा.

Previous Post

३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री

Next Post

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026