• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद

admin by admin
January 6, 2020
in मुख्य बातमी
0
कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद
0
SHARES
0
VIEWS

बीड  : चिमुकल्या मुलींचे इवल्याशा डोळ्यांनी कुतूहलपणे पाळण्यातील रंगीबेरंगी फुग्यांकडे पाहणे, ते धरण्यासाठी हात उंचावणे.. जवळच फेटा बांधून उभ्या असलेल्या आई, आत्यांकडे एक नजर फिरवणे, यासह सोबतीला कानावर पडणाऱ्या बारशाच्या गितांचा मंजूळ आवाज व नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई अशा उत्साही वातावरणात एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात रविवारी रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.

बीड येथे स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ३१ डिसेंबरपासून सोळावा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कीर्तनाला विविध उपक्रमांची जोड दिल्याने महोत्सव सामाजिक परिवर्तनाचे केंद्र झाला आहे. रविवारी महोत्सवाच्या विस्तीर्ण सभामंडपात तिरंगी रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यातील ८३६ चिमुकल्या मुलींचा सामूहिकरीत्या नामकरण सोहळा करण्यात आला. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह प्रतिष्ठानचे गौतम खटोड आणि सुशील खटोड, भरतबुवा रामदासी आदी उपस्थित होते. साडेआठशे मुलींच्या नामकरण सोहळ्याला आल्याने माझे महत्त्व वाढले असल्याने अशा कार्यक्रमाला मुलींची मावशी म्हणून यायला मला आवडेल.

स्त्री जन्माचे इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि सन्मानाने कुठलेच स्वागत झाले नसेल. अशा कार्यक्रमांनी स्त्री भ्रूण हत्येचा डाग पुसला जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलीच्या जन्माचे उत्स्फूर्तपणे स्वागत करणारा जिल्हा अशी ओळख होईल, अशी आशा खासदार डॉ. मुंडे यांनी व्यक्त केली.

मागच्या वेळी याच मंडपात ३०१ मुलींच्या नामकरणाचा सोहळा झाला होता. यावेळी बेटी बचाव, बेटी पढाव या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत तब्बल साडेआठशे मुलींचा एकत्रित नामकरण सोहळा झाल्याने या कार्यक्रमाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नेंद घेण्यात आल्याची माहिती या संस्थेचे समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुराम यांनी दिली.

मातांचा साडी-चोळी भेट देऊन गौरव

मुलींच्या सामूहिक नामकरण सोहळ्यात सहभागी झालेल्या मातांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले आणि साडी-चोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर चिमुकल्या मुलींनाही पाळणा, ड्रेस, सुकामेवा, खेळणी भेट देण्यात आल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मुलींच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे समाधान वाटते. खासदार प्रीतम मुंडे यांनी कीर्तन महोत्सवासाठी पुढच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण द्यावे, अशी अपेक्षा गौतम खटोड यांनी व्यक्त केली.

Previous Post

शरद पवार राष्ट्रपती होणार?

Next Post

कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post

कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026